Monday, November 27, 2006

एकदा तरी.... प्रेम करावं.......


एकदा तरी.... प्रेम करावं.......

एकदा तरी.... प्रेम करावं.......

प्रेम कुणावर तरी एकावर करावं,

स्वतच्या नकळत झोकून द्यावं,माणसांच्या गलबल्यात नजरेनी बोलावं,

नि प्राणप्रिय एकांतात स्पर्शानी स्पर्शावं,

तीच्याशिवाय दूसरं काहि सुचूच नये इतकं बेभान व्हावं,

तीच्या नुसत्या चाहुलीने देहभान हरपावं,

ती समोर नसताना शब्दानी मुक्त बोलावं,

समोर आली की मात्र निशब्द व्हावं,

वाट बघावी आपणच मानलेल्या संकेत स्थळि,

याव तिनं,जावं पूढे तसंच निघून एकदाही न बघता मागे वळुन,

आपण इथं तिष्ट्त असल्याची तिच्या मनाने नोंद तरी घ्यावी,

उद्या इथे परत याच वळणावर तिची पाउले थोडीतरी अडावी?

तिच्या आठ्वणीने सूरु होणारा दिवस,

तिच्या आठ्वणीतच सम्पावा,

साऱ्या जगापासून एक तुटलेपण यावं,

तिच्या स्वप्नांच्या खरेपणात गुंतून जावं,

अनुभवावी प्रचंड मानसिक शांति नि अफाट अस्वस्थता,

अजमावं एकमेकाना नि उगीचचं दूखवावं,

त्या निमित्तानी तरी भेटिला यावं,

एकदातरी द्यावा अनूभव असा बेहोशीचा,

बरोबरीने प्रवास व्हावा ,दोनच पावलांचा

,चुकीचा तर चुकीचा !!!!!!!!!

No comments: