सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात
अनोळखीही असतात काही
डोळे जरी फ़सले तरी
मन कधीच फ़सत नाही....
आपणच पटववून देत असतो
अनोळखीतील ओळख मनाला,
दिवस उलटले की आपण,
पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला....
अगदी जवळचे चेहरेही कधी कधी
ओळख हरवून बसतात,
काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही
खुप ओळखीच्या वाटतात....
धडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो
असा स्वत:चा चेहरा,
पण त्यातील प्रत्येक ठोका
असतोच ना आपला...?
कागदावरचे शब्दही हा
नियम मोडत नाहीत,
कधी मी त्यांना तर
कधी ते मला ओळखत नाहीत
No comments:
Post a Comment