Thursday, February 28, 2008

अक्षतांचं चांदणं ....


चांदणं चांदणंच असतं। त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही.

डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही। म्हणुनच गोंगाट नाही।

ते नम्र असतं। उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही.

ते जितकं प्रखर, तितकं सौम्य।

चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का?

अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार

फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!

.......(अक्षतांचं चांदणं ....अरविंद)

Wednesday, February 20, 2008

भावना...........


शब्दाचं बोट धरून भावना कागदावर अलगद उतरली,

मनातल्या चिमुकल्या बीजातून कवितेची वेल बहरली!

कवितेच्या वेलीला कवितांच्याच कळ्या आल्या,

भावनांच्या रेशीमगाठी अजून-अजून मोकळ्या झाल्या!

एके दिवशी कळ्यांतून मोहक फुलं उमलली,

मनातली अनेक कोडी कवितांनीच उकलली!

कवितेची बकुळफुलं कोमेजूनही फुललेली,

नकळतच दिसली मनाची बंद दारं खुललेली

ज्या ज्या वयात जे जे करायचं


ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावायचं

तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं

प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं

म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...

ज्या ज्या वयात जे जे करायाचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं

तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं

प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं

म्हातारपणी त्याच बागेत निवृत्त मनानं रमायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथे मिटवायचं

तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुध्दा करायचं

प्रौढ झाल्यावर आपल्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं

उतारवयात साऱ्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं! तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात

पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात!

वाऱ्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं

गडगडणाऱ्या मेघासारखं बोलकं होता यायला हवं

अंधाराच्या गर्भामधे ज्योत ठेवता यायला हवी

एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी!

कुठल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं!

आईलाही....


(आई तुझ मन, तुझ्या आशा,तुझं महात्म्य समजुन घेन्यासाठी आम्हि खरच लहान आहोत.)

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही

'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी

आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी

आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही

तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी

आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी

आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी

आम्ही सदा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी

आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही.

आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही

वडील घरचे अस्तित्व असतात..............


आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वाडिलाना महत्व असुनाही त्यांच्या विषयी जास्त लिहिले जात नाही, बोलले जात नाही, कोताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महत्म्यांनी आईचे महत्व अधिल सांगितले आहे. देवदेविकानी आइचेच गोडवे गायले आहेत. लेखाकानी कविनी आईचे तोंडभरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टिना आईची उपमा दिली जाते पण वडिलनविषयी कुठेच फारस बोलले जात नाही. कही लोकनी बाप रेखाताला पण तोही तपत व्यसनी, मर्जोड़ करनाराच, समजत एक दोन टक्के असे बाप असतील पण चांगल्या वडिलनबद्दल काय?आईंकडे अश्रुंचे पात असतात पण वडिलांनकड़े सयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वाडीलानाच करावे लगते आणि राडन्यापेक्षा संत्वन करनारयावर जास्त तान पडतो कारन ज्योतिपेक्षा समयीच जास्त तपते ना? रोजच्या जेवानाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहते पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई मोकलेपनाने रडू शकते, पण रात्रि उषित तोंद खुपसून मुस्मुसतातात ते वडील असतात. आई रड्ते, वाडिलाना राड़ता ही येत नही, स्वताचे वडील वराले तरी राड़ता येत नाही, कारन तय्ना छोट्या भावंडाना जपयाचे असते. आई गेली तरीही राड़ता येत नही कारन बहिनिला आधार व्हयाच असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरंसाठी आधार बनवा लागतो.जिजाबाई नि शिवाजी घदवाला अस आवश्यक म्ह्नव पण त्याच वेळी शाहाजी राजाची ओधातान सुधा ध्यान्यत घ्यावी. देवकीच, यशोधाच कौतुक अवश्य करव पण पोरातुं पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुधा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र आवश्य असल पण पुत्र वियोगाने तड्फ़ड्न मरण पावला तो पिता दशरथ होता.

वाडीलाच्या टाचा जिजलेल्या चापलाकडे पाहिले की त्यांचे प्रेम कलाते. त्यांचे फांटके बनियान बघितले की कलते "अम्ह्च्या नशिबची भोके त्यांच्या बनियानला पडलित". त्यांचा दाढ़ी वाधलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊँन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पाँन्टच वापरातिल. मुलगा सलून मधे २०-२५ रुपये खर्च करतो. मुलगी पार्लर मधे खर्च करते पण घरातला दधिचा सबन संपला म्हनून आंघोलिच्या सबनाने करतात. अनेकदा ते नुसत पानी लाऊंन दाढ़ी करतात. वडील आजारी पडले तरी डॉक्टर कड़े जाट नाहीत, ते आजराला घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याना भिती वाटते. कारन पोरिचा लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते, घरात उत्पन्नाचे दूसरे साधन नसते, एपत नसते तरीही मुलाला मेडिकल ला एन्जिनिअरिंग ला प्रवेश मिलों दिला जातो. ओधातान करून मुलाला डर महिन्याला पैसे पठावाले जातात, पण सर्वच नसली तरीही कही मुले अशी असतात की जे पैसे आले की मित्रना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पठावाले त्यांची टिंगल करतात. एकमेकांच्या बापच्या नावाने एकमेकाना हाका मारतात.आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात. ज्या घरत वडील आहेत त्या घराकडे वाइट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण त्या घरचा कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण टी जवळ घेते, कवताळते, कौतुक करते, पण गापचुप जाउन पेढयांचा पुढा घेउन येणारा बाप कोणाच्या लक्षात रहत नाही. चटका लागला, ठेच लागली की "आई ग" हा शब्द बाहेर पडतो पण रास्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक लागतो तेव्हा "बापरे" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकतकाली आई चलते पण मोथिमोठी वादल पेल्ताना बापच आठवतो. काय पटते न????

कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वजन जातात पण मयाताच्या प्रसंगी बापाला जावे लगते. कोताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी सारखा जात नसतो पण गरीब लेकिच्या घरी तिच्या कालजी पोटी सारखा फेरया मारेल. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होनारा बाप, मुलीच्या लग्नासठी उम्बरठे जिज्वानारा बाप, घरच्यासाठि स्वताच्या व्यथा दड़्पनारा बाप..........खरच किती ग्रेट असतात न????वडिलांचे महत्वा कोणाला कळत? लहनपनिच वडील गेल्यावर अनेक जबाबदाराया खुप लवकर पेलाव्य लागतात, एकेका वस्तुसाठी तरसवे लागते त्याना. वाडिलाना खरया अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापशी फोनवर बोलताना बदलेला आवाज एक श्क्नात्त कलतो., ती अनेक प्रश्न विचरते. कोनतिही मुलगी स्वताच्या इचछा बाजूला ठेउन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते, जपते..... इतारांची श्रद्धा, असाच आपल्याला जानावा हीच प्रतेक बापाची किमान अपेक्षा असते.

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं............


वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं,

म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

दूरावा म्हणजे प्रेम...


दूरावा म्हणजे प्रेम...

अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...

दूराव्यात असते आठवण...

अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...

अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..

दूरावा असह्य असतॊ...

ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...

पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...

दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन,

ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?

ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

तू जवळ असतीस तर,


तू जवळ असतीस तर,


कदाचीत स्वप्नांमध्ये जगत नसतो..


पण मग, वास्तवात तरी कुठं जगत असतॊ...


कदाचीत स्वप्न अन वास्तव यांच्यातील दूवा तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....


तू जवळ असतीस तर,कदाचीत एकटाच गुणगूणत नसतो...


पण मग, तुझ्या आवाजात तरी कसा मुरलॊ असतॊ...


कदाचीत माझ्या मनाचा आवाजच तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....


तू जवळ असतीस तर,कदाचीत असा गुमसूम बसत नसतॊ...


पण मग, भानावर तरी कुठं असतॊ...


कदाचीत माझ्या भावनांचा आधारचं तू असतेस...


जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस...


तुझ्या दूराव्याचं कारण मला माहित आहे..


अन तुझ्या आठवणींचं वास्तव्य देखील माझ्याजवळ आहे...


पण तुझ्या वास्तव्यातही तर माझ्याच आठवणी आहेत...


कदाचीत आपल्या आठवणीचं आपलं वास्तव्य आहे...


कारण वस्तव्यात जरी नसलीस तरी,आठवणींत तू माझ्या अन मी तुझ्या जवळ आहे....