'खोटारडा भुकंप'
या मित्रानं लिहिलेल्या नविन कवितेला
नऊ प्रतिसाद मिळल्यावर मी त्याचं अभिनंदन करु लागलो,
तेव्हा तो फक्त उदासवाणं हसला.
'अरे ते नऊही प्रतिसाद मीच दिलेत.'
या त्याच्या उत्तरानंतर मला बसलेला धक्का मात्र
अगदी खराखुरा होता !
'तुच माझी प्रतिभा,
तुच माझी कल्पना,
तुच माझी कविता.'
असं एक कवि त्याच्या
प्रेयसीला म्हणाल्यावर ती उत्तरली,
'तुच माझा उमेश,
तुच माझा सुरेश,
तुच माझा दिनेश.'
आता यात स्वतःच्याच फाडफाड तोंडात मारुन घेण्यासारखं काय होतं,
ते तिला शेवटपर्यंत कळलंच नाही !
विमानातल्या शेजारच्या आसनावर
गणु गवळ्याला पाहुन मी चमकलोच.
आता विमानप्रवास स्वस्त झाले असले, तरी इतके?
'काय गणु?' मी विचारल्यावर
'गंगी म्हशीला डाक्टरांनी हवापालट सांगितला व्हता,
आन म्याबी लई दिस कुटं गेलो नव्हतो, तवा...'
या त्याच्या उत्तराने मी हबकलोच.
एक टोचणी मात्र मनाला लागुन राहिली.
आपल्या सासुची एवढी इच्छा होती,
तर आपण तिला बरोबर घ्यायला हवं होतं...
'अरे, सगळी माहिती पुसली गेल्याचं दुःख नाही,
पण संगणकावरच्या माझ्या ७०० कविताही गेल्यारे !'
माझ्या मित्रानं असं म्हणताच
मी चेहेरा पाडला
पण मनातल्या मनात खदखदुन हसलो.
संगणक विषाणुंतही
'हितकारी' नि 'विनाशकारी'
असे दोन प्रकार असतात,
हा माझा ग्रह आता पक्का झालाय.
आपल्या आवडत्या कोंबडीला
एकदा एक कोंबडा
थेट म्हटला 'आय लव यु !'
तिचा होकार ऐकुन
एकदम बेशुद्ध पडला,
डॉक्टर म्हणाले 'बर्ड फ्ल्यु !'
'प्रिये तुझ्या पोळ्यांचे
आकार का विचित्र असे
जणु भारतातल्या राज्यांचे
कुणी काढलेत नकाशे !'
'अय्या, तरी मी म्हटलं
पोळ्या का बनेनात गोल
अहो एम ए ला होतं
माझं स्पेशल भुगोल !'
No comments:
Post a Comment