जिला कधीही पालवी फुटणार नाही,
अशी आशा मिळाली....
व्याकुळतेची परिसीमा भासेल, अशी दशा मिळाली....
स्वप्नांचे उभारलेले डोलारे,
क्षणात उध्वस्त झाले;मनातच गुदमरून जाईल,
अशी विराणी कथा मिळाली....
भ्रमाच्या मोहक धुक्यातून,
आणलो गेलो भानावर मी;
प्रतिभाही काळवंडून गेली,
अशी वेदनेची प्रभा मिळाली....
थकलो मी, खचलो मी,
अस्मितेला माझ्या तडा गेला;
अश्रुही झाले महाग,
अशी निराळी व्यथा मिळाली....
काय गुन्हा झाला माझा,
अजुनही न कळले मजला;
मृत्युनेही व्हावे लाजिरवाणे,
अशी एकाकी जगण्याची सजा मिळाली....
No comments:
Post a Comment