फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं.
No comments:
Post a Comment