Wednesday, November 29, 2006

सुकलेली फुलं.............


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...

स्तब्ध होऊन

तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...

क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं

पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो

बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही

बोलणच काय,

तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात

फुल तसच सुकत जातं

सगळी तयारी सगळी हिम्मत

नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा

थांगपत्ता लागत नाही

माझं मन तिच्याशिवाय

काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

पण तरीही आज ठरवलंय

तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य

तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

सुख दु:ख..............


दु:खाच्या घरी एकदा

जमली होती पार्टी

दारु बीरु पीऊन अगदी

झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!

बिलकुल लाजू नका

इतके दिवस छ्ळल म्हणून

राग मानू नका!

मनात खूप साठल आहे

काहीच सुचत नाही

माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय

आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे

जुळे भाऊ होतो

पाच वर्षांचे होतो तेव्हा

जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली

नी गोंधळ असा उठला...

माणसांच्या त्या गर्दी मध्ये

सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत

दुनियेच्या जत्रेत

दिसतोय का 'सुख' माझा

कुणाच्या ही नजरेत...

"सुखा बरोबरचे लहानपणीचे

क्षण त्याला स्मरले

आणि सुखाच्या आठवणीने

दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली

दु:खाकडे पाहून!

दु:खालाही सुख मिळावे

वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता

मी सुद्धा फ़िरतोय

दु:खाला शांत करायचा

खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे

आहेत सुख दु:ख सारथी

सुख मिळाले तर दु:खाच्या घरी

मीच देईन पार्टी

ओळख................


सभोवतालच्या ओळखीच्या चेहऱ्यात

अनोळखीही असतात काही

डोळे जरी फ़सले तरी

मन कधीच फ़सत नाही....

आपणच पटववून देत असतो

अनोळखीतील ओळख मनाला,

दिवस उलटले की आपण,

पून्हा एकदा ओळखतो स्वत:ला....

अगदी जवळचे चेहरेही कधी कधी

ओळख हरवून बसतात,

काही गोष्टी मात्र चेहरे नसूनही

खुप ओळखीच्या वाटतात....

धडधडत्या ह्र्दयाला कूठे असतो

असा स्वत:चा चेहरा,

पण त्यातील प्रत्येक ठोका

असतोच ना आपला...?

कागदावरचे शब्दही हा

नियम मोडत नाहीत,

कधी मी त्यांना तर

कधी ते मला ओळखत नाहीत

मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.....


तू कूठेही असलीस

तरी माझ्या जवळ आहॆस

तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही

माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆ

सएक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही

एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी

पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाही

समी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपली

समला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं

कारणं आज मी जरी हरलो पण

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस

तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही

माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही

एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी

पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस

मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं

कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

सजा..............



जिला कधीही पालवी फुटणार नाही,

अशी आशा मिळाली....

व्याकुळतेची परिसीमा भासेल, अशी दशा मिळाली....

स्वप्नांचे उभारलेले डोलारे,

क्षणात उध्वस्त झाले;मनातच गुदमरून जाईल,

अशी विराणी कथा मिळाली....

भ्रमाच्या मोहक धुक्यातून,

आणलो गेलो भानावर मी;

प्रतिभाही काळवंडून गेली,

अशी वेदनेची प्रभा मिळाली....

थकलो मी, खचलो मी,

अस्मितेला माझ्या तडा गेला;

अश्रुही झाले महाग,

अशी निराळी व्यथा मिळाली....

काय गुन्हा झाला माझा,

अजुनही न कळले मजला;

मृत्युनेही व्हावे लाजिरवाणे,

अशी एकाकी जगण्याची सजा मिळाली....

Tuesday, November 28, 2006

मन......


मन......


मन कधी फ़सत,


मन कधी रुसत...


कुनाला हे कळत,


कुणी उगाचच हसत..


हसताना मनात बरंच काही असतं...


सांगायला मात्र काही जमत नसत...


समजुन घ्यावं असं खुप वाटतं....


समजतय त्याला हेही कळत....


शब्दांच्या शोधात मन हरवत...


न बोलताच मग डोळ्यांना समजत...


गालावरच्या खळीत उत्तर मिळतं....


पापन्यांखाली ते हळुच लपतं.........

स्वप्न...!!!


स्वप्न...!!!

बघता बघता आकाष हे निळे

ढगांनि भरले रंग सावळे

बरसुनी येती सर सर धारा

छेडती तुझ्या आठवणींच्या तारा

मी तुझ्या त्या आठवणीत भिजावे

ओल्या मनी या स्वप्न रुजावे

हळुच तु त्या स्वप्नी यावे

क्षितीजावरती चल म्हणावे

धुंद झालेल्या श्रावणात त्या

बेधुंद होऊन आपण भिजावे

येताच झुळुक गार हवेची

नकळत तु मझ्या मिठीत शिरावे

दडलेलं गुपित तुझ्या मनी या

किलकिलत्या डोळ्यांनी मला सांगावे

अबोल शब्दांच्या स्पर्षातुन मग

तुझे नी माझे प्रेम फुलावे

उधळुनी श्वासांची मूक्त फुले तु

कुशीत मझ्या विरुनी जावे

विस्मरुन साऱ्या जगास मग या

तुझ्यात फ़क्त मी हरवुनी जावे

खुलतील डोळे अलगद जेंव्हा

स्वप्न न्हवे हे सत्य असावे

अशा त्या सोनेरी क्षणांसमोर

इन्द्रधनुही वेडे फ़िके पडावे...

जीतकी ओढ मला तुझी

तितकीच तुलाही आहे का ?

जीतके प्रेम माझे तुझ्यावर

तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही

मला कधी पाहतेस का ?

उत्तर रात्रि शान्तसमयी

स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव

,म्हनुण व्याकुळ होतेस का ?

तो क्षण सम्पुच नये,

असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,

आठवुन कधी पाहतेस का ?

त्यातल्या प्रत्येक शब्दाने,

मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,

स्वत:शी कधी हसतेस का ?

माझ्या सोबत वेडे व्हावे,

असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,

विचारणे माझे सम्पनार नाही

प्रश्न माझे अनेक आहे,

उत्तर एकाचे तरी देशील का ?

पाऊस..............वेडापिसा


पाऊस नसतोच कधी वेडापिसा

वेडे असतोत आपण

आपणच करीत असतो त्यावर

आपल्या स्वप्नांची पखरण

पाऊस नसतोच कधी आपला, आपल्यासाठी

आपणच दिवाणे असतो पावसाचे

म्हणूनच त्याच्या भरून येण्याला आपण

मानू लागतो फळ आपल्या नवसाचे

पाऊस नसतोच कधी

आभाळभर गरजणारा, मातीभर पसरणारा

तो असतो फक्त एक मोर

आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून रानभर नाचणारा

पाऊस नसतोच कधी आपला मित्र वगैरे

गृहीत धरतो त्याला उगाचच आपण

आणि करत जातो त्याच्या भोवती

आपल्या भावबंधांची गुंफण

पाऊस नसतोच कधी आपला सोबती

आपण उगीचच ऐकवतो त्याला गऱ्हाणी

त्याची चूक इतकीच की तो म्हणत नाही कधी

माझ्यासमोर नकोत असली रडगाणी

पाऊस नसतोच कधी डोळ्यातून बरसणारा

आपल्यालाच असते सवय अतिशयोक्ती करण्याची

नाहीतर आभाळाला तरी काय गरज होती

असं आतून गहिवरून येण्याची

खरं तर

पाऊस नसतोच कधी खरा पाऊस

ते असतं फक्त आपलं म्हणणं

नाही तर

त्याला तरी कुठे मान्य आहे

असं जीव तोडून बरसणं

मैत्रि अशी असावी..........


मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?


एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे,

पावसात चिंब भिजणारी;

अन मलाही तिच्यासोबत,

भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे,

फुलपाखरांमागे धावणारी;

फुलांचे सारे रंग उधळत,

झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे,

मुग्धपणे हसणारी;

माझ्या बाहूपाशात,

अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे,

कशीही दिसणारी;

पण मनाने मात्र,

अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे,

जिवलग मैत्रीण असणारी;

आमच्या नाजुक नात्याला,

हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे,

माझ्या भावना जाणणारी;

मी जसा आहे तसेच,

माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे,

प्रेमाला प्रेम समजणारी;

सुखा-दुःखात माझ्या,

तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

girl friend.........


मलाही girl friend मिळावी ॥

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,

आम्हा दोघांची मने जुळावी ।

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,

प्रितीची खळी उमलावी ।

डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,

रूपाची ती राणी असावी ॥

अशीच माझी स्वप्नसुंदरी,

ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,

प्रणयाचेच घास भरवू ।

रिक्षात मीटरला साक्षी मानून,

प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥

आयुष्यातील सारी दु:खं,

जिच्या सहवासात टळावी ।

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,

आधी girl की आधी friend ।

आयुष्यभराचं नातं हवं,

का हवा one night stand ॥

देव करो तीच्याकडूनचं,

प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी

कधी न अंतरे …


नभी दूर दिन मावळू लागे

सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे

मम मनाच्या गाभार्‍यात

कोण गे उजळे हे स्वप्नदिवे , हे स्वप्नदिवे …

क्षणी एका अवचित श्वास जडावे

पळी त्याच नयनांत जलद दाटले

येइ जवळ कोणी प्रेमभराने

स्पर्श करी पण नजर ही चुकवे , नजरही चुकवे …

कधी गीत मीलनाचे राही अधुरे

तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे

अडके गुंती , वैरी मन माझे,

मज छळी साहुनी ते दु:खही परके , दु:खही परके …

अंतरास ठावे मम गुपित गहिरे,

कैसा स्वर्णस्पर्श स्वप्ना या लाभे,

हे मम स्वप्न , तेचि आप्त माझे,

सावली यांची मम कधी न अंतरे, कधी न अंतरे …





जीवन................एक गुपित


जीवन

जीवन एक गुपित असत

कधि कुठ सान्गायच नसत

जीवन एक कोड असत

जे कधिही सुटत नसत

दुःखाला भागायच असत

सुखाला गुणायच असत

आसवाना बाहेर न आनता

नेहमिच हसत राहायच असत

भुतकाळ विसरुन जावून

नवीन पाउल टाकायच असत

ऊर भरून रडल्यानन्तर

स्वःताच पुन्हा सावरायच असत

अटळच असेल जाण कोनाच

स्वार्थासाठी त्याना थाम्बवायच नसत

आपल मी पण विसरून जाइल

एवढ कोनाला आपल म्हणायच नसत

पन्खात बळ आल्यावर घरट सोडयच असत

नव्या रूतून्च्या शोधात दिशाहीन व्हायच असत

जीवन असच जगायच असत....खरच् !!!

जीवन असच जगायच असत....

साधं सोपं आयुष्य..............


साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं

रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी

वागायला थोडंच हवं

प्रत्येक वागण्याचं कारण

सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं

ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते

करून बघितलं पाहिजे आपण

जसं जगावं वाटतं तसंच

जगून बघितलं पाहिजे आपण

करावंसं वाटेल ते करायचं

जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो जेंव्हा

जाग आपल्याला येते

आपली रात्र होते जेंव्हा

झोप आपल्याला येते

झोप आली की झोपायचं

जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची

जशी पक्वान्नं पानात

आपल्या घरात असं वावरायचं

जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं

आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा

त्याचं कौतुक कशाला एवढं

जगात दुसरं चांदणं नाही

आपल्या हसण्या एवढं!

आपणच आपलं चांदणं बनून

घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं

हसावंसं वाटलं तर हसायचं

रडावंसं वाटलं तर रडायचं

माझे मृत्यूपत्र....


माझे मृत्यूपत्र....

माझे मृत्यूपत्र....

मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये...

फुलांच्या भाराखाली, प्रेत माझे मढू नये...

रचावी मजसाठी, साध्या कष्ठांचीच चिता;

चंदनाचा सहवास, मला कधी घडू नये...

घडावी मोकळ्या कुरणात, मला मोक्षप्राप्ती;

मजसाठी स्मशानाची पायवाट,

कुणाच्या पायाखाली पडू नये...

उडावी खुल्या हवेत, माझ्या राखेची वावटळं;

माझ्या अस्थी कुठल्याही, नदीतळाशी सडू नये...

मी गेल्यावरही रहावे, सगळ्यांनी आनंदात;

माझ्या नसण्याने कधीही,

कुणाचे काही अडू नये...

मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये...

कविता..............



'खोटारडा भुकंप'
या मित्रानं लिहिलेल्या नविन कवितेला
नऊ प्रतिसाद मिळल्यावर मी त्याचं अभिनंदन करु लागलो,
तेव्हा तो फक्त उदासवाणं हसला.
'अरे ते नऊही प्रतिसाद मीच दिलेत.'
या त्याच्या उत्तरानंतर मला बसलेला धक्का मात्र
अगदी खराखुरा होता !

'तुच माझी प्रतिभा,
तुच माझी कल्पना,
तुच माझी कविता.'
असं एक कवि त्याच्या
प्रेयसीला म्हणाल्यावर ती उत्तरली,
'तुच माझा उमेश,
तुच माझा सुरेश,
तुच माझा दिनेश.'
आता यात स्वतःच्याच फाडफाड तोंडात मारुन घेण्यासारखं काय होतं,
ते तिला शेवटपर्यंत कळलंच नाही !

विमानातल्या शेजारच्या आसनावर
गणु गवळ्याला पाहुन मी चमकलोच.
आता विमानप्रवास स्वस्त झाले असले, तरी इतके?
'काय गणु?' मी विचारल्यावर
'गंगी म्हशीला डाक्टरांनी हवापालट सांगितला व्हता,
आन म्याबी लई दिस कुटं गेलो नव्हतो, तवा...'
या त्याच्या उत्तराने मी हबकलोच.
एक टोचणी मात्र मनाला लागुन राहिली.
आपल्या सासुची एवढी इच्छा होती,
तर आपण तिला बरोबर घ्यायला हवं होतं...

'अरे, सगळी माहिती पुसली गेल्याचं दुःख नाही,
पण संगणकावरच्या माझ्या ७०० कविताही गेल्यारे !'
माझ्या मित्रानं असं म्हणताच
मी चेहेरा पाडला
पण मनातल्या मनात खदखदुन हसलो.
संगणक विषाणुंतही
'हितकारी' नि 'विनाशकारी'
असे दोन प्रकार असतात,
हा माझा ग्रह आता पक्का झालाय.

आपल्या आवडत्या कोंबडीला
एकदा एक कोंबडा
थेट म्हटला 'आय लव यु !'
तिचा होकार ऐकुन
एकदम बेशुद्ध पडला,
डॉक्टर म्हणाले 'बर्ड फ्ल्यु !'

'प्रिये तुझ्या पोळ्यांचे
आकार का विचित्र असे
जणु भारतातल्या राज्यांचे
कुणी काढलेत नकाशे !'

'अय्या, तरी मी म्हटलं
पोळ्या का बनेनात गोल
अहो एम ए ला होतं
माझं स्पेशल भुगोल !'

Monday, November 27, 2006

मनातले शब्द मनातच राहून गेले...


मनातले शब्द मनातच राहून गेले...

तीला बोलावलं भेटायला,

ठरवलं सारे सांगून टाकायचे,

पण ती आली मैत्रिणी सोबत,

अन काही बोलताच नाही आले,

आणि पुन्हा एकदा,

मनातले शब्द मनातच राहून गेले...

हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,

पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,

आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

लिहित बसलो रात्रभर,

वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,

पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,

आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

भेटली एकटी बस-स्टॉपवर ती,

वाटलं संधी चांगली आहे,

पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,

आणि पुन्हा एकदा,

मनातले शब्द मनातच राहून गेले...

तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,

पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,

आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले... "

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?


तुला लागतो चहा,

मला लागते कॉफ़ी

तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी

तुला वाटते थंडी,

मला होतं गरम

तू आहेस लाजाळू,

मी अगदीच बेशरम

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ १ ॥

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे

आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे

मी मात्र झोपतो १२ च्या नंतर

रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ २ ॥

फ़िरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग

कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग

मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा

कळत नाही रंग राखाडी आहे की काळा

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ३ ॥

घालतो मी शर्ट इस्त्री न करता

जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता

तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट

बाहेर निघताना नखरे सतराशे साठ

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ४ ॥

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा

जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा

तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण

बारीक तुझी नजर, डोळे आहेत की दुर्बीण?

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ५ ॥

१ सांगू का तुला?

हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?

ऊन आणि सावली राहतात ना जसं

तुझं आणि माझं जमेल का तसं? ॥ ६ ॥

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच........एक मेकाला सावरण्यासाठी


आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

एक मेकांना दिलेल्या दुःखांवर

एक मेकांसोबत घालवलेल्या अनेक

आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

अनेक जुन्या आठवणींनी आणलेले

एक मेकांच्या डोळ्यातील

आनंदाश्रु पुसण्यासाठी.....

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया अनेक

दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या

हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात

एक मेकांचा हात धरण्यासाठी,

एक मेकाला सावरण्यासाठी...........

गालांवरच्या पावसाला.........


आज अचानक भल्या पहाटे

एक आठवण जागवून गेली

तुझे आणि माझे बंध

आपसूकच दाखवून गेली

सांग ना !

काय तुझे आणि माझे नाते

उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा

कधी नव्हे ते थकलो

गालांवरचा पाऊस मी

थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले

का आज एकतर्फी वाटले

पहाटेच्या या ऒल्या शणी

का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज

शोधतोय मी पाऊस गाणे

धुक्याच्या या ओंजळीमध्ये

प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना

कधी एक गोड किनारा

गालांवरच्या पावसाला

सावरणारा एक जिव्हाळा

गालांवरच्या पावसाला

एक तरी मैत्रीण असावी................


एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी

बाईकवर मागे बसावी

जुनी हीरो होंडा सुद्धा मग

करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी

चारचौघीत उठून दिसावी

बोलली नाही तरी निदान

समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी

कधीतरी सोबत फिरावी

दोघांना एकत्र पाहून

गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी

जिच्याशी निर्मळ संवाद असावा

कधीतरी छोट्या भांडणाचा

एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी

आयुष्याच्या अनोळखी वळणावर

तुमच्या व्यथा वेदनांवर

तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी

जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा

तुमचासुद्धा खांदा कधी

तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी

चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात

मित्रांचे दिवे मावळले म्हणजे

चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

बघ माझी आठवण येते का?.............


मुसळधार पाऊस..

ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा.

बघ माझी आठवण येते का

हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.

इवलासा मेल वाचून बघ

बघ माझी आठवण येते का??

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.

डोळे मिटुन घे.तल्लीन हो.

नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.

इनबॉक्स वर ये.

तो भरलेला असेलच.

मग वाचू लाग.माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.

वाचत राहा मेल संपेपर्यंत.तो संपनार नाहीच.

शेवटी मेल बंद कर. डिलीट करु नकोस.

फ़ॉरवर्ड करु नकोस. पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.

आता दुसऱ्या मेलची वाट बघ. बघ माझी आठवण येते का??

घड्याळात पाच वाजतील. तुला निघायची घाई असेल.

तितक्यात एक मेल येईल. तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.

तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण. तु म्हण सर्व्हर डाऊन होता.

मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.

तो पुन्हा फॉरवर्ड करेल. तू तो डीलीट कर. एखादी कविता वाच.

बघ माझी आठवण येते का??

मग निघायची वेळ होईल

तरी पुन्हा मेल येईल. तो म्हणेल काळजी घे स्व:ताची.,

मग तुही तसेच लिही मेल मागून मेल येतील फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होती

शेवटी सगळे डीलीट कर.आता रिकाम्या इनबॉक्स कड बघ.

बघ माझी आठवण येते का?

या सुंदर जीवनात..........पडायच असत प्रेमात कधी कधी


या सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर "जागली होतिस का रात्री?"

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

हे सगळ तुझ्यासाठी मनाच कुढन आहे.....


हे सगळ तुझ्यासाठी मनाच कुढन आहे.....

पन असे समझु नकोस की......

पन असे समझु नकोस की......

डोळे माझे शा॑त आहेत.

व्यवहारी जीवनाला फ़ितुर आहे.

पन असे समझु नकोस की,

ते कधी पाणावलेच नाही.

आकाश माझे निरभ्र आहे.

चा॑दण्या॑चीही स॑गत आहे.

पन असे समझु नकोस की ते

कधी ढगाळलेच नाही.

काटे माझ्या रस्त्यात आहेत

ती सबध पसरली आहेत.

पन असे समझु नकोस की

माझ्या आयुष्यात कधी गुलाब

उमललेच नाही.

शब्द् माझे निशःब्द् आहेत.

झाडासारखे मुके आहेत.

पन असे समझु नकोस की

ते कधी बोललेच नाही.

आर्त स्वराचे गाने आहे.

भुतकाळात मन जाते आहे.

पन असे समझु नकोस की

हे सगळ तुझ्यासाठी मनाच कुढन आहे.....

नातं..................तुझ्या माझ्या मैत्रीचं..!


जसं अतूट नातं असतं

पाऊस आणि छत्रीचं,

तसंच काहीसं असावं

तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं

मुलायम अस्तर जरीचं,

तसंच काहीसं असावं

तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं

श्रावणाशी सरीचं,

तसंच काहीसं असावं

तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं

किना-याशी खात्रीचं,

तसंच काहीसं असावं

तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

मैत्री


मैत्री ही मोठी अजब चीज आहे. कधी एका शहरात राहून किंवा अगदी एका इमारतीमधेही राहूनही ओळख ' हाय हलो' च्या पुढे सरकत नाही. कधी समोरासमोर बसून प्रवास करताना महिनोनमहिने बोलण 'हवापाण्या' पर्यंतच रहात. कधी बरोबरच्या सहकार्‍याच पूर्ण नावही आपल्याला माहीत नसतं रादर माहीत करुन घ्यायची गरजच वाटत नाही. पण कधी कधी मात्र मैत्री व्हायला काही कारणही लागत नाही. अचानक वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी ती आपल्याला सामोरी येते, वळवाच्या पावसासारखं ती आपलं अंगण भिजवून टाकते. हा असा अचानक जाणवलेला मैत्रीचा सुगंध जास्त मनोहारी असतो. एखादीच भेट, एखादाच प्रसंग मग मैत्रीची खुण पटवायला पुरेसा होतो. 'माझीया जातीचा' भेटल्याची खुण पुरेशी वाटते मैत्रीची मोहोर मनावर उमटायला. निरपेक्ष मैत्री, निव्वळ स्नेह हे असेच खडकामागच्या झुळझुळ झर्‍यासारखे असतात. प्रसन्न, ताजे. कदाचित वाट चालून पुढे जाताना झरा अदृष्यही होऊ शकतो. किंवा मार्ग बदलून वाहू शकतो. दैनंदिन जिवन जगताना ही मैत्री मग आपले अस्तित्व दाखवेलच असेही नाही. पण काही हरकत नसते.

प्रेम?


का रे असा विचित्र वागतोस?'

असा विचित्र का रे वागतोस?

प्रेम आहे ना तुझे माझ्यावर?

'घायाळ होत ती विचारते.'

प्रेम?

मी कधी म्हणलो होतो,

माझ तुझ्यावर प्रेम आहे?'

तो सावधपणे विचारतो.

ती गोन्धळते, भाम्बावते.

खरच तो कधी प्रेमाच बोललेलाच नसतो.

पण तरी तिला ते,जाणवल असत, खोल कुठेतरी.

पण आता त्याच्या डोळ्यात,

तिला दिसतो विश्वामित्रि पवित्रा,बचावासाठी घेतलेला.

अन तिला हेही जाणवत,

त्यानच केलय जर नाकबूल तर,

जगातली कुठलीही शक्ती,

त्याच्याकडून वदवून घ्यायला,

अपुरी पडणार आहे.

ती फक्त विझत जाते,

कणाकणानी.....!

मृगजळ.....................फसवणूक"


अनाकलनीय

साथीला अथान्ग जलाशय,

तरी धबधब्याचे आकर्षण समजू शकते,

पण म्रूगजळ दिसणे,

त्यामागे धावणे,

खरच अनाकलनीय असते.

"मृग" ह्या शब्दाची कशी गंमत आहे बघ..

मृगजळ - पाण्याचा होणारा आभास - फसवणूक"

कांचनमृग" - सीतेची मारिचानी केलेली - फसवणूक"

शहामृग" - म्हणायला पक्षी पण उडता येत नाही - फसवणूक

एक "मृग" नक्षत्र होतं जे नेमाने यायचं - आता तर तिथेही - फसवणूक

शेवटचे......................


शेवटचे

शेवटचे तुला हसताना पाहिलय,

गालावर पडनारया खळीला पाहिलय.

शेवटचे तुला खेळताना पाहिलय,

खेळता खेळता चिडताना पाहिलय.

शेवटचे तुला वाट बघताना पाहिलय,

हातात नसलेल्या घडाळ्याकडे बघताना पाहिलय.

शेवटचे तुला रडताना पाहिलय,

गालावरुन ओघळनारया अश्रुना पाहिलय.

शेवटचे तुला विसरताना पाहिलय,

दिलेल्या वचनाना तोडताना पाहिलय.

शेवटचे,

शेवटचे मी स्वःताला पाहिलय

मला माहित नाहि नन्तर माझ्या शरीराच काय झालय.

मनाच प्रतिबिंब................


भोवतीच्या जगात

आपल्याच मनाच प्रतिबिंब

आपण शोधत रहातो

कसल्याशा नजरेनं...

कधी जगाचा वेध

सारं जग स्वतःमधे सामवून घेत

तर कधी जगाच्या पलिकडे

स्वतःच्याच अस्तित्वाच क्षितीज न्याहाळत....

अशाच तंद्रीच्या वेळी

मनाच अभाळ आशयघन होऊन

भरुन येवू लागतं.जिवाची घालमेल असह्य होते

क्षितीजावर तेव्हा शब्दांची नक्षत्रे फ़ेर धरू लागतात

आणि हलकेच झरू लागतातमनाचे आरस्पानी थेंब ...........

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो... स्तब्ध होऊन

तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं

पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो

बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही

बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं

सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही

माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

आयुष्य खूप सुंदर आहे.................


आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसलं तरी,

एकट्यानेच ते फुलवत रहा,

वादळात सगळं वाहून गेल,

म्हणुन रडत बसू नका,

वेगळ अस काही,

माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,

सागराकडे अथांगता आहे,

माझ्याकडे काय आहे,

असं म्हणून रडू नका,

अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.

आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!

मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.

अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून

मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,

उत्साह ध्येयाने भारुन म्हणून .........

आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसल तरी

एकट्यानेच ते फुलवत रहा......

सुख दु:ख


दु:खाच्या घरी एकदा

जमली होती पार्टी

दारु बीरु पीऊन अगदी

झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!

बिलकुल लाजू नका

इतके दिवस छ्ळल म्हणून

राग मानू नका!

मनात खूप साठल आहे

काहीच सुचत नाही

माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय

आता राहवत नाही..

मी आणि सुख दोघे

जुळे भाऊ होतो

पाच वर्षांचे होतो तेव्हा

जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली

नी गोंधळ असा उठला...

माणसांच्या त्या गर्दी मध्ये

सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत

दुनियेच्या जत्रेत

दिसतोय का 'सुख' माझा

कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे

क्षण त्याला स्मरले

आणि सुखाच्या आठवणीने

दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली

दु:खाकडे पाहून!

दु:खालाही सुख मिळावे

वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता

मी सुद्धा फ़िरतोय

दु:खाला शांत करायचा

खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे

आहेत सुख दु:ख सारथी

सुख मिळाले तर दु:खाच्या घरी

मीच देईन पार्टी