Monday, May 17, 2010

काय असत प्रेमात .....?


काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?
कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....? काहीच माहिती नव्हत.....

चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....
आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....तिला याची काहीच कल्पना नव्हती...!

आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....

पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....

मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!

घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!

एकट एकट राहू लागलो.....शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''हे सुद्धा खर झाल...!!

तिला तर काहीच सांगितलं नव्हत....इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!

अरे वा......! मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......ती आलीच.....पण.....येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......

जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''मी तो आवाज ऐकला......अगदी खरा खरा.........

No comments: