तिच्या एका होकाराने
पूर्ण जीवन बदलून टाकले
चारच दिवस का होईना
मला तिचे प्रेम मिळाले..
-
सर्वात आनंदाचे क्षण
देऊन गेली ती मला
कळालेच नाही कधी
ती सोडून जात होती मला..
-
मी निस्वार्थी प्रेम केले होते
तिचे सुद्धा खरे असावे
मग असे का घडावे
आनंदाच्या क्षणी दुःख यावे..
-
सर्व तिच्या मनाचे खेळ
माझ्या हाती काहीच नव्हते
तिने खेळलेल्या खेळातील
मी एक साधा प्यादा होतो..
-
तिने सुरु केलेला खेळ
आज तिनेच संपवलाय
मला जिंकणे कठीण नव्हते
पण मी तिच्यासाठी हरलोय..
No comments:
Post a Comment