जयाचे बोट धरून पाहिले पावूल टाकतो , त्यालाच आपण विसरतो.,
आणि लेकराला चालताना पहाणारया आईचेच कौतुक करत बसतो.,
आपल्या जन्माच्या यातना आई सहन करत असते.,
तर बापाची चप्पल मंदिर शोधण्यात झिझात असते.,
एक वेळचे जेवण न घेताच बाप झाल्याचे पेढे वाटतो.,
केवळ पुरुष असला म्हणून आपले अनंदाश्रु गळयातच गिळतो..!!
रक्ताचे पाणी करून लेकराला शालेत घालतो.,
नरकीय परिसस्थितही बाळहट पुरवितो.,
मुलीच्या लग्नापाई नुसत्या भजी पाहून परततो.,
दुरदैव कोणाला शिवू नये म्हणून पावसातच रडतो.,
चुकलोच कधी तर मर-मर मारतो.,
तोच हात रात्रि जेवताना मात्र थर-थर कापतो..!!
सणाला आईला जुनाच शर्ट धुवायला सांगतो.,
नवपना अणन्यासाठी गुपचुप रात्रीच इस्त्री करतो.,
पोराना मात्र कोराच ड्रेस आणतो.,
पर अजारी पडले तर आई काळजीपाई रात्रभर जागते.,
तर बापाला ओवर-टेमला रात्र कमी पड़ते.,
पोर आपल्या पायांवर उभा झाल्यावर मात्र माय-बापाला विसरतो.,
चार दिवसांच्या बायकोच्या पदरात पसरतो.,
आपल्या एशो-आरामत जलम-दात्यालाच विसरतो..!!
ठेच लागल्यावर मात्र तो " आई ग..! " केल्यावाचुन राहणार नाही.,
समोरूनाच साप गेला तर " बाप रे..! " म्हणल्यावाचून राहणार नाही.,
घेतले हजारो जलम जरी ,उपकर या दैवतांचे फेड़ता येणार नाही.,
उद्या आपणही माय-बाप होणार हे विसरून चालणार नाही.,
पाठवलेच वृधाश्रमात नाराधमाने तरी यांची ममता संपणार नाही.,
आपल्या जन्मदात्याचे हल करनारयाला
नरकातसुधा जागा मिळणार नाही.,
नरकातसुधा जागा मिळणार नाही..!!
No comments:
Post a Comment