Monday, May 17, 2010

तिची आठवण ...



सारखी सारखी तिची
एवढी आठवण का येते....?
सतत मनाला क्षणाक्षणाला
का छळत असते....?

रोजच आम्ही भेटत असतो
रोजच आम्ही बोलत असतो...
तरी सुद्धा तिला भेटायला
ओढा माझा हरपल असतो....

तासनतास आम्ही मनमोकळ बोलत असतो
एकमेकांचे सुख दुखः वाटून घेत असतो

एकदा ती सहजच म्हणाली......
मला विसरतोस म्हणूनच तुला आठवण येते.....
त्यावेळेस मी निरुत्तर होतो.....
पण.......

आठवण म्हणजे काय.....?
तिने जाण्याचा विषय काढताच माझ मन अधीर होत
नजरेआड होण्याअगोदर तिला पुनः एकदा भेटू वाटत......
अस का होत नेहमी कि......
नेमक जाण्याच्या अगोदर तिच्या बरोबर भरपूर बोलायचं असत......
बरच काही सांगायचं असत.....

मलाच नाही सांगता येणार काय होतंय ते .....
पण एवढ मात्र खर कि
तिची आठवण मला क्षणाक्षणाला येत असते
सतत मनाला छळत असते.....

No comments: