सोड बासरी शस्त्र घेऊनी
परशूराम हो श्रीक्रुष्णा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
शंख फुंकलास धावून आलो
विश्वरूपाने पावन झालो
अकरावा अवतार घे आता...
शक्तियुक्ती संमिश्र गुणा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
दूर्योधन, जयद्रथ इथलेच सारे...
अत्याचारी वादळवारे
अन्यायाचा तम उजळाया
का..विकत घ्यावे रविकिरणा ?
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
हिरवा, भगवा परका नाही
व्रण आत्म्यावर नवखा नाही
अर्जुन होऊन लढलो केवळ
एवढाच ना आमचा गुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
भले रुक्मिणी होईल विधवा,
विजय कदाचित मिळेल कौरवा...
तरिही तूच ये चक्र घेऊनी...
नको होऊ सारथी पुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
साधू होऊन रहाणे नाही
रक्त सिंधूला वाहाणे नाही
शौर्याचा अन् क्रौर्याचाही
आठवूया इतिहास जूना
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
सोड बासरी शस्त्र घेऊनी
परशूराम हो श्रीक्रुष्णा
1 comment:
Parashuram ho Shrikrishna.
Post a Comment