तु कितीही उशीरा आलीस
तरी वाट पहायचो
तुझ्या मोकळ्या केसात
जिवाला गुंतवायचो..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..
तु हसलीस की ह्सायचो
तु रुसलीस की रुसायचो
प्रत्येक वेळी हार मानुन
मीच तुझी समजुत काढायचो ..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..
तु गाजवायचिस हक्क
मी कुरबुरत नसायचो ..
तुझ्या गालावरच्या खळीसाठी
सदा धडपडायचो..
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..
तुझा वाढदिवसही तु विसरायचीस
मी आठवण करायचो..
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
आवर्जुन असायचो...
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..
मला आठवत नाही कधी
तुझ मन दुखवन्यासारख वागलो
तुझी बेमर्जी होऊन
क तुला मुकलो...?
जरा सांगशिल का ?
कुठे मी चुकायचो ..
जरा सांगशिल का.....का का का ?
No comments:
Post a Comment