बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही.....
कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही.....
उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही.....
तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही.....
माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत
No comments:
Post a Comment