बघ,
माझी आठवण येते का?
अन तुझ्या डोळ्यात पाणी दाटत का?
अन,
मग आठवते का?
निळ्याशार समुद्रातील आपली भेट...
बघ जमल तर...
आठवलस ना तर आठवेल तुला,
लाटेकडे पाहून भिजलेल तुझ मन,
मनातील घालमेल अन मग माझी मिठी,
बघ जमल तर...
आठवून बघ तुझ्या डोळ्यातील पाणी,
शहारलेल अंग,कापणारे ओठ,
त्या नजरेने बरच काही सांगून गेलीस,
मग मलाही आठवेल...
माझ्यासाठी आलेल खोट हसू तुझ्या ओठी,
क्षणात लाटांवर स्वर तू,
माझा हात हातात घेउउन बहरणारी तू,
सहज चुंबन घेवून गेलीस,
पहिल्या प्रेमाचा पहिला नजराणा देवून गेलीस,
पुन्हा भेटशील...
तेव्हा दोघही विसरू सगळ जुन,
नात्याची वीण घट्ट विणू,
मग परत बाय म्हणताना,
माझ्याही डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम दाटेल.
No comments:
Post a Comment