एका सागराची कथा...
एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली'
हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी
मी नाही जा !बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.बघच मग.
सरिताच तीबोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट सरितेच्या दिशेने
लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'
1 comment:
surekh... mast creativity!!!
Post a Comment