Wednesday, January 31, 2007

एक माणुस मला भेटलाय,


एक माणुस मला भेटलाय,

दुःखाकडे हसत हसत पहाणारा,

सुखाकडे केविलवाण्या नजरेनं,

डोळे भरुन पहाणारा,

दुसऱ्यांच्या दुःखात

आपलं दुःख शोधणारा

पाठीवर दुःखाचं ओझं घेवुन चालणारा,

वाटेवरल्या पाउलखुणा,

न बुजविता चालणारा,

आपलं दुःख कुणापाशी,

कधीही न सांगणारा,

एक माणुस मला भेटलाय,

झऱ्यासारखा वहाणारा....