Sunday, November 26, 2006

ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी...........


संध्यादेखील करतो मी,

दारुसुद्धा पितो मी,

पुरणपोळी चापतो मी,

तंगडीदेखील तोडतो मी.

हिंदी सिनेमे पाहतो मी,

विंग्रजीसुद्धा झाडतो मी,

'दादांना' मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.

शिव्या सुद्धा देतो मी,

कविता देखील करतो मी,

कधी कुणालाही हरवतो मी,

कधी जिंकता जिंकता हरतो मी.

अध्यात्मावर बोलतो मी,

फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,

मी मी करतो मी,

कधी सेल्फलेस देखील होतो मी.

प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,

स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"

कधी देवाशी बोलतो मी,

कधी मौनाला धरतो मी,

जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.

प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला,

नेहमीच असतो उत्सुक मी,

स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र,

अनुत्तरीतच ठेवतो मी."

आपलं आयुष्य वेगळं,

आपली दुःख वेगळी!"

नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....

सभोवती मात्र जेव्हा,

असहाय्य दीन पाहतो मी,

ख्ररच,

स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी!!!!

No comments: