Wednesday, May 31, 2017

भजन


स्वामी समर्थ स्वामी समर्थ
नित्य वाचे स्वामी समर्थ 
अमृताहूनी गोड हे नाम
नाही आवडे याहूनी काही
प्रेमाची साऊली मायेची माऊली
कृपा असावी माझ्यावर सर्वकाळ
दयेचा सागर प्रेमाचा पाझर
हट्ट माझे पूरवी लडिवाळे
गोरख म्हणे स्वामी नाम हे मोठे
जपा निरंतर ध्यानी मणी
--------------------------------------------
मुखी नाम तुझे घेता
हरती पातकांच्या चिंता
कृपा कटाक्ष तुझा होता
भवभय हरते क्षणमात्रा
चरणांची धूळ लाविता कपाळा
भुक्ती मुक्ती मिळे या जीवाला
गोरख म्हणे छंद हा नामाचा
नित्य असो माझ्या अंतरंगी
-----------------------------------------------
जाहलो मी धन्य पाहता रूप साजिरे
न लगे मज आणि काही स्वामी राया
नित्य तुझा संग नित्य तुझा छंद
ओढ हि मनाला स्वामी राया
वेद शास्त्र पूराण आम्हांसी ना ठावे
फक्त तुझे नाम मुखी स्वामी राया
नाही कोणी आप्त नाही कोणी सोयरा
तू माझा सांगाती स्वामी राया
चराचरी तूच, तूच जागोजागी
गोरखच्या हृदयी तुझी सत्ता
-----------------------------------------------
जाहलो मी धन्य पाहता हे रुप
किती साठवावे हृदयात
विचारांची गर्दी आसवांची भरती
माझे मन तुझ्या चरणात
नाही ठावे मज पाप आणि पुण्य
मंत्र हा उद्धाराचा स्वामी समर्थ
नाम जपा सारखा न कोणता छंद
ध्यानी मनी उच्चारा स्वामी समर्थ
गोरख म्हणे तोचि तोचि एक धन्य
ज्याच्या मुखी सर्वकाळ स्वामी नाम
 
------------------------------------------------
धाव स्वामी राया पाव स्वामी राया
ताराया तुझ्या या पामराला
कोण प्रकाराने तुज मी भजावे
येईल कळवळा तुज स्वामी राया
कोणता उपाय करू मी आता
द्यावे मज दर्शन स्वामी राया
मागणे तुम्हा ठायी काय सांगू मी आणिक
गोरखला उद्धारा या स्वामी राया

अरविंद भांगरे 

भक्ती गीत



तुझे रूप चित्ती राहो आस पामराची
मनामध्ये मूर्ती माझ्या स्वामी समर्थांची

हाती कमंडलू आणि कानी कर्ण माला
जगताला उद्धाराया स्वामी माझा आला 

दिव्य तुझी तेज कांती अजाण तुझे बाहु
अक्कलकोटी वटवृक्षी चरण कमल पाहू

ध्यास धरा नामाचा आस दर्शनाची
घडो नित सेवा देवा तुझ्या चरणांची

अरविंद भांगरे 

भक्ति गीत


स्वामींच्या भजनी तल्लीन झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

निराकार निरामय मनोहारी रूप
सगून रुपी अवतरले स्वामी भूमीवर
द्वारी दर्शनासी आज मठी आलो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

गळ्यात तुळशी रुद्राक्षाच्या माळा
मस्तकी शोभे चंदनाचा टीळा
कस्तुरीच्या गंधे सुगंधित झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

ध्यास एक नामाचा चित्त जडो पायी
चूक भूल स्वामी राया पदरात घेई
अहंभाव सोडुनिया शरण मी आलो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

दिगंबर दत्तावतारी स्वामी परब्रह्म
करूणाकारी कैवारी दयेचा सागर
कृपा करी दिनावरी समरूप झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

अरविंद भांगरे 

भक्ती गीत



दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिव्य सुंदर मोहक मूर्ती
आनंदाला येते भरती
मनामनाच्या गाभाऱ्यातून
साद येतसे पुन्हा
दत्तगुरू हो म्हणा मुखाने दत्तगुरू हो म्हणा

ब्रह्म विष्णू आणि महेश्वर
त्रैमूर्ती चे हे रूप मनोहर
भाळावरती चंद्रकोरही विराजे पुन्हा
दत्तगुरू हो म्हणा मुखाने दत्तगुरू हो म्हणा

त्रिशूळ डमरू चक्र हाती
कमंडलू अन कमळ शोभती
नयनरम्य या पादुकांचे दर्शन होई पुन्हा
दत्तगुरू हो म्हणा मुखाने दत्तगुरू हो म्हणा

तूच कर्ता आणि करवीता
सकल जगाचा तूच नियंता
जगताला या उद्धाराया येसी पुन्हा
दत्तगुरू हो म्हणा मुखाने दत्तगुरू हो म्हणा

अरविंद भांगरे 

स्वामींचा गोंधळ.......


स्वामींचा गोंधळ

अजान बाहू तुझी मूर्ती ही मोहविते मजला
अगाध लीला करुणी दाविसी तूच स्वामी नाथा
स्वामी कृपा करी दिनावरी 
आलो तुझ्याच रे मी दारी
आता दर्शन मजला दे.........
दर्शन मागतो माउली दर्शन मजला दे....

भस्म विलेपित मोहक कांती तेजोमय सुंदर
दत्तावतारी जग उद्धारा आले रूप घेऊन
इवल्याश्या वारुळा प्रगटशी तूच स्वामी नाथा
दिनांचा कैवारी होशी तू सगून रूप घेता
स्वामी कृपा करी दिनावरी 
आलो तुझ्याच रे मी दारी
आता दर्शन मजला दे.........
दर्शन मागतो माउली दर्शन मजला दे....

हात जोडूनी तुला विनावितो घोष तुझ्या नामाचा
मठात येऊनी तुला पूजितो उद्धार कर सर्वांचा
भिऊ नको तू मी पाठीशी वचन तुझे ऐकता
मनास लाभे शांती आणि मिळे सुख संपदा
स्वामी कृपा करी दिनावरी 
आलो तुझ्याच रे मी दारी
आता दर्शन मजला दे.........
दर्शन मागतो माउली दर्शन मजला दे.....

अरविंद भांगरे