Monday, May 5, 2008


'लव' की प्रेम?'

लव' शब्दच कीती पोकळ,

'प्रेम' शब्दातच कीती बळ.

'लव' एक बेछुट अंधानुकरण,

'प्रेम' एक अतुट बंधन.

'लव' मनांची फ़सवणुक,

'प्रेम' मनांची जपणूक.

'लव' कोमेजलेला गंध,

'प्रेम' दर्वळलेला सुगंध.

'लव' नसमजून बोलणं,

'प्रेम' नबोलून समजणं.

'लव' मेसेज सरकवणं,

'प्रेम' मेसेज बनणं.

'लव' आंधळ करतं,

'प्रेम' बघायला शिकवतं.

म्हणूनच,'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,

'प्रेम' असलं तर सारकाही असतं,

'प्रेम' असलं तर जग असतं.

तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?

'लव' की 'प्रेम'!

प्रेमात आणि मैत्रीत


प्रेमात आणि मैत्रीत झोकुन देणे, विश्वास टाकणे धोका पत्करणे हे फ़ार गरजेचे असते ......

प्रेम म्हणजे भावनांपुढे विचारांनी हार स्विकारलेली

प्रेम म्हणजे मनापुढे मेंदूने शरणागती पत्करलेली.......

प्रेमात हवी फक्त एक नजरभेट ,स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी..

अवचित हलकेच स्मित हास्य अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी.....

एवढ सगळ घडत असत .....म्हणुन....

प्रेम करण सोडायच नसत...........

मर्यादेत राहुन आपण वागायच असत......

समाजाच भान ठेऊन जगायच असत.........

आणि हे सगळ लक्शात ठेऊनच .........

आपल्या माणसान्वर प्रेम करायच असत.......

जे झाल ते गेल......ते प्रेम नसेलच मुळीहे लक्शात घ्यायच असत........

प्रेम करणारया माणसालाफ़ुलान्प्रमाणे जपायच असत..........

Sunday, May 4, 2008

कवीता असते.........


कवीता असते डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी

कवीता असते फुला त लपलेल्या सुगधासारखी

कवीता असते वातावरणात पडलेल्या दवासारखी

कवीता असते हृदयात धड धड नार्‍या ठोक्यांसारखी

कवीता असते शब्दात दडलेल्या स्वरांसारखी

कवीता असते ओठ वर य नार्‍या आशीर्वाद सारखी

कवीता असते पाठीवर पडलेल्या थापेसारखी

कवीता असते मधात विरघळलेल्या गोडीसारखी

कवीता असते बागेत उमललेल्या काळीसारखी

कवीता असते आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्या सारखी

कवीता असते स्वाचन्दपणे बागडनार्‍या पाखरा सारखी

कवीता असते मातीच्या मंद गंधासारखी

कवीता असते घाव भरणार्‍या मलमासारखी

कवीता असते दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी

कवीता असते दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासरखी

अशी गोड तू......


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू

निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,

सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,

नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,

दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू

यातना,व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

फुलांच्या बागेत आज काटा बोलला,नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,मग म्हंटले आता विचारुच या काट्यालातो मलुल होता पण तरीही सांगु लागला,"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,माझा जीव गुंतलाय ना!"मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"तो भडकला अन म्हणाला,"अरे आईबापही रक्षक असतात ना,त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??ते जाउदे असं बघ,तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)आणि हो,कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'भारी पडतोच रे!!"एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुनबाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक काटा रुतला...

पाचोळा समजून चरोळ्याना माझ्या तुडवू नका,कृपा करून माझ्या शब्दाची खिल्ली मात्र उडवू नका.राग येत नाही, पण वाईट वाटतं इतकंच...माझं किवा तुमचं कोणाचं तरी... नशीब मात्र फुटकंच !खरं तर हा ज्याच्या त्याच्या पहाण्याचा दृष्टीकोन आहे,तसंही जगात सर्वसुखी असा कोण आहे ?म्हणून काही लिहू नये... असंही वाटू लागतं,त्याक्षणी दुसरं मन माझं ... जाब माझ्याकडे मागतं !मन म्हणतं.......................उधळ रंग कल्पनाचे, खुलुदे काव्याची कळी,शब्दान्धान्च्या काव्याला.... नको पडूस असा रे बळी.स्वयंप्रकाशी तारयाचा, अरे ज्याना त्रास होतो..काजव्यात वा दिव्यात ज्याना सुर्याचा भास होतोअशा शुल्लक उल्लुकाना, काय कळावा राजहंस ?मोरपंखी स्पर्श देखील... ज्याच्यासाठी सर्पदंश !म्हणूनंच.....माझ्या आनंदासाठी मी काही काव्य करत जातो,स्वर्गसुखाच्या अपेक्षेने खरं तर मी मरत जातो...मेल्यानंतरच स्वर्ग पहाण्यात आहे खरी मजा...काय फायदा आहे, होण्यात भातुकलीतला राजा ?शब्दाना धार असते, तरीही.....जिभ कापली जात नाहीम्हणून कहिही लिहावं, अशी आपली 'जात' नाही.

अव्यक्त प्रेमाची कधीच वाटली नाही खंत

बाळगला संयम योग्यासारखा नव्हतो जरी संत

आनंद होकाराचा दुःख नकाराचं अनुभवु शकलो नाही

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

ठरवू पाहात होतो मीच माझं प्रारब्ध

झालो तिच्यावर लुब्ध पण होतो निःशब्द

मागुन तिच्या मी उगीच भटकलो नाही

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

मी होते तिथेच आहे.........


मी होते तिथेच आहे बाकि सारे बदलले

ह्रुदयातल्या स्पन्दनाचे वादळ आता शमले

मी होते तिथेच आहे काळ मात्र बदलला

सरत्या सरितला गारवा मात्र उरला

मी इथेच आहे पन तु मात्र नाहिस

मझ्या मनाला तुझिच तरि साथ आहे

दूर जरी मी तुझ्यापासुन इथे

तुझाच मझ्या हाति हात आहे

मैलांचे अंतर आपल्यात आहे

तरि मने मात्र जोडलेलि

माझ्या एकाकि जीवनाने

आठवनीची चादर ओढलेलि

खरच आठवनित तुझ्या जेव्हा पापणीची पणती विझते

तुझ्या चाहुलिने संध्या रात्र रात्र जळतेपण हे मझे मलाच कळते




चार पावलं आपणसोबत चालत जाऊ


तुझे आणि माझे सूरकुठवर जुळतात पाहु...


अर्थात जमत असेल तर चलमी


आग्रह करणार नाहीआज तरी, "तुला यावच लागेल,


असा हट्ट ही धरणार नाहीपण मनातल्या मनात कुढण्यापेक्षाव्यक्त


करणं बरं असतंकारण इथून तिथून ऐकलेलंसारंच


काही खरं नसतंकुणी कुणाला का आवडावंहे सांगता


येत नाहीचार चौघांना विचारून कुणीहृदय देत नाहीतसंच


काहीसं माझं झालंत्याच धुंदीत propose केलंजवळ अशी


कधी नव्हतीसंचpropose ने आणखीच दूर नेलंजे झालं ते वाईट


झालंपण झालं ते बरंच झालंखरं सांगणं गुन्हा असतोएव्हढं मात्र


लक्षात आलंजाऊ दे,झालं गेलं विसरून जामागे न वळता


चालत राहामला विसर असं मी म्हणणार नाहीपण


तू तो प्रयत्न करून पाहा...थांब...इथून पुढं मला एकट्यालाच जायचंयपण


धन्यवाद; तू इथवर आलीस...सारं आयुष्य नसलीस तरीचार पावलं माझी झालीस....