Thursday, February 17, 2011

का?


ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
का? जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
का? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का? आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.

डोळ्यांचीच भाषा


तुझा माझ्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन

जरा बदललाय असं वाटतंय

कुणास ठाऊक पण कदाचित
तुझं माझ्यावर प्रेम जडलंय असं वाटतंय .
नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने .
माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने .
तुला काही सांगायचे नसेल तर ते सांगू नको
पण काहीतरी बोल, अशी अगदीच गप्प राहू नको .
तुझ्या अशा वागण्याने, मलाही वेगळेच जाणीव होते.
तुझ्या डोळ्यातून मात्र ,तुझे अबोल प्रेम बोलून जाते .
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर मी हि अबोल राहेन .
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर मी हि अबोल राहेन .
तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन .

प्रेम...नाती...आठवण


प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र
जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शूभ्र

मावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव
सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीव

सागरासारखा अथांग असावा विश्वास
दुसर्‍यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास

हातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण
अलगद हात हाती येतो सलते एक आठवण

मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती
अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

कधी तू...


कधी तू...शीतल वाटणारी चांद रात...कधी तू...जाळून खाक करणारी सूर्याची आग...
कधी तू...धमकावनाऱ्या सागरात...कधी तू...कवेत घेणाऱ्या आकाशात...
कधी तू...विनाश आणणाऱ्या वादळ वाऱ्यात...कधी तू...अंकुर फुलवणाऱ्या पाऊस पाण्यात...
कधी तू...विजेच्या कडकडाटात...कधी तू...रात्रीच्या मंद आवाजात...

कधी तू...भिरभिर भिरणाऱ्या भ्रमरात...कधी तू...निपचित पडलेल्या सिंहात...
कधी तू...मन मोहणाऱ्या गुलाबात...कधी तू...चिखलात उगवणाऱ्या कमळात...
कधी तू...कडवट निम्बात...कधी तू...बहरलेल्या आंब्याच्या मोहरात...
कधी तू...रातराणीच्या सुगंधात...कधी तू...मध्यान्हीच्या भर उन्हात...

कधी तू...एकत्र घालवलेल्या दिवसात...कधी तू...आठवणीत काटलेल्या एक एक क्षणात...
कधी तू...बेफिकीर बेलगाम हसण्यात...कधी तू...आवर घातलेल्या हमसून रडण्यात...
कधी तू...मनाला येऊन मिळणारी ओलसर लाट...कधी तू...परतीच्या पाऊलखुणा नसलेली एकाकी वाट...
कधी तू...उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत...कधी तू....माझ्या मिटलेल्या पापण्यात...