Wednesday, May 31, 2017

भजन


स्वामी समर्थ स्वामी समर्थ
नित्य वाचे स्वामी समर्थ 
अमृताहूनी गोड हे नाम
नाही आवडे याहूनी काही
प्रेमाची साऊली मायेची माऊली
कृपा असावी माझ्यावर सर्वकाळ
दयेचा सागर प्रेमाचा पाझर
हट्ट माझे पूरवी लडिवाळे
गोरख म्हणे स्वामी नाम हे मोठे
जपा निरंतर ध्यानी मणी
--------------------------------------------
मुखी नाम तुझे घेता
हरती पातकांच्या चिंता
कृपा कटाक्ष तुझा होता
भवभय हरते क्षणमात्रा
चरणांची धूळ लाविता कपाळा
भुक्ती मुक्ती मिळे या जीवाला
गोरख म्हणे छंद हा नामाचा
नित्य असो माझ्या अंतरंगी
-----------------------------------------------
जाहलो मी धन्य पाहता रूप साजिरे
न लगे मज आणि काही स्वामी राया
नित्य तुझा संग नित्य तुझा छंद
ओढ हि मनाला स्वामी राया
वेद शास्त्र पूराण आम्हांसी ना ठावे
फक्त तुझे नाम मुखी स्वामी राया
नाही कोणी आप्त नाही कोणी सोयरा
तू माझा सांगाती स्वामी राया
चराचरी तूच, तूच जागोजागी
गोरखच्या हृदयी तुझी सत्ता
-----------------------------------------------
जाहलो मी धन्य पाहता हे रुप
किती साठवावे हृदयात
विचारांची गर्दी आसवांची भरती
माझे मन तुझ्या चरणात
नाही ठावे मज पाप आणि पुण्य
मंत्र हा उद्धाराचा स्वामी समर्थ
नाम जपा सारखा न कोणता छंद
ध्यानी मनी उच्चारा स्वामी समर्थ
गोरख म्हणे तोचि तोचि एक धन्य
ज्याच्या मुखी सर्वकाळ स्वामी नाम
 
------------------------------------------------
धाव स्वामी राया पाव स्वामी राया
ताराया तुझ्या या पामराला
कोण प्रकाराने तुज मी भजावे
येईल कळवळा तुज स्वामी राया
कोणता उपाय करू मी आता
द्यावे मज दर्शन स्वामी राया
मागणे तुम्हा ठायी काय सांगू मी आणिक
गोरखला उद्धारा या स्वामी राया

अरविंद भांगरे 

No comments: