Sunday, May 4, 2008


फुलांच्या बागेत आज काटा बोलला,नेहमीच्या भाषेत मी त्याला हाकलला,आज एक फुल नाही मिळाले वाट्याला,मग म्हंटले आता विचारुच या काट्यालातो मलुल होता पण तरीही सांगु लागला,"मित्रा, मी रक्षक होतो त्या फुलासाठी,पण आज डोळ्यासमोर हारलो रे!"मी म्हंटले, "नवीन काय रे यामध्ये??रोज तर सगळेच असेच फुल खुडतात"..तो म्हणाला, "अरे त्या त्या फुलात,माझा जीव गुंतलाय ना!"मी म्हंटले, "अरे वेड्या हा तर निव्वळ मुर्खपणा!!"तो भडकला अन म्हणाला,"अरे आईबापही रक्षक असतात ना,त्यांना ही तर काटाच ठरवितात ना कधीतरी!!मग त्यांनी त्यांनी आपल्या फुलास जीव नाही का लावायचा??ते जाउदे असं बघ,तुही तर असशील ना कुणासाठी 'काटा',(कारण तुही रक्षक आहेस कुणाचा!!)कोणीतरी तुझ्यासाठी ही असेल 'काटा'(तुलाही कोणीतरी हवे आहेच ना!!)तुही 'फुल' असशील ना कुणासाठी,(तुझ्यावर जीव लावणारे आठव!!)कोणीतरी 'फुल' असेल ना तुझ्यासाठी,(तुझा जीव कुणासाठी तरी तुटतो ना!!)आणि हो,कधीतरी एक 'काटा' दुसर्‍या 'काट्याला'भारी पडतोच रे!!"एवढं ऐकुन जड पावलाने बागेतुनबाहेर पडत होतो अन तेवढ्यात पायात एक काटा रुतला...

1 comment:

Santosh Pawale said...

kavita sunder aahet......
santosh laxman pawale