Sunday, May 4, 2008

कवीता असते.........


कवीता असते डोळ्यात लपलेल्या अश्रूंसारखी

कवीता असते फुला त लपलेल्या सुगधासारखी

कवीता असते वातावरणात पडलेल्या दवासारखी

कवीता असते हृदयात धड धड नार्‍या ठोक्यांसारखी

कवीता असते शब्दात दडलेल्या स्वरांसारखी

कवीता असते ओठ वर य नार्‍या आशीर्वाद सारखी

कवीता असते पाठीवर पडलेल्या थापेसारखी

कवीता असते मधात विरघळलेल्या गोडीसारखी

कवीता असते बागेत उमललेल्या काळीसारखी

कवीता असते आकाश्यात उधळलेल्या इंद्रधनुष्या सारखी

कवीता असते स्वाचन्दपणे बागडनार्‍या पाखरा सारखी

कवीता असते मातीच्या मंद गंधासारखी

कवीता असते घाव भरणार्‍या मलमासारखी

कवीता असते दुसर्‍यांसाठी जळणर्‍या पणतीसारखी

कवीता असते दुखात खंबीर सात देणार्‍या मित्रासरखी

1 comment:

Anonymous said...

Atishaya surekh Kavita...