Wednesday, February 20, 2008

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं............


वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं,

म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

No comments: