Kahi khas Vyaktisathi, aani mazya mitransati, marathi kavitecha ha sangrah, aani kahi aathavanina ujala denyacha ha maza chotasa prayatna
Tuesday, December 9, 2008
अकरावा अवतार.......
परशूराम हो श्रीक्रुष्णा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
शंख फुंकलास धावून आलो
विश्वरूपाने पावन झालो
अकरावा अवतार घे आता...
शक्तियुक्ती संमिश्र गुणा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
दूर्योधन, जयद्रथ इथलेच सारे...
अत्याचारी वादळवारे
अन्यायाचा तम उजळाया
का..विकत घ्यावे रविकिरणा ?
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
हिरवा, भगवा परका नाही
व्रण आत्म्यावर नवखा नाही
अर्जुन होऊन लढलो केवळ
एवढाच ना आमचा गुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
भले रुक्मिणी होईल विधवा,
विजय कदाचित मिळेल कौरवा...
तरिही तूच ये चक्र घेऊनी...
नको होऊ सारथी पुन्हा
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
साधू होऊन रहाणे नाही
रक्त सिंधूला वाहाणे नाही
शौर्याचा अन् क्रौर्याचाही
आठवूया इतिहास जूना
लांबव आता थांबव आता...
थोपव विक्रुत आक्रमणा
सोड बासरी शस्त्र घेऊनी
परशूराम हो श्रीक्रुष्णा
एक कळ..
Monday, May 5, 2008

प्रेमात आणि मैत्रीत

Sunday, May 4, 2008
कवीता असते.........

अशी गोड तू......




मी होते तिथेच आहे.........


चार पावलं आपणसोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूरकुठवर जुळतात पाहु...
अर्थात जमत असेल तर चलमी
आग्रह करणार नाहीआज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाहीपण मनातल्या मनात कुढण्यापेक्षाव्यक्त
करणं बरं असतंकारण इथून तिथून ऐकलेलंसारंच
काही खरं नसतंकुणी कुणाला का आवडावंहे सांगता
येत नाहीचार चौघांना विचारून कुणीहृदय देत नाहीतसंच
काहीसं माझं झालंत्याच धुंदीत propose केलंजवळ अशी
कधी नव्हतीसंचpropose ने आणखीच दूर नेलंजे झालं ते वाईट
झालंपण झालं ते बरंच झालंखरं सांगणं गुन्हा असतोएव्हढं मात्र
लक्षात आलंजाऊ दे,झालं गेलं विसरून जामागे न वळता
चालत राहामला विसर असं मी म्हणणार नाहीपण
तू तो प्रयत्न करून पाहा...थांब...इथून पुढं मला एकट्यालाच जायचंयपण
धन्यवाद; तू इथवर आलीस...सारं आयुष्य नसलीस तरीचार पावलं माझी झालीस....
Saturday, March 15, 2008
एक थेंब ....

एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला, धरती चुंबनाच्या प्रतिक्षेत तहानलेला..
एक थेंब .. कमळाच्या देठावर अधारलेला, ओघलण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..
एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला, आपणच तळे झालो या आंनदाने भारावलेला..
एक थेंब .. वार्यात उंच झेपावलेला, गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..
एक थेंब ... थेंबाथेंबातुन बरसलेला, शिस्तिच्या आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..
एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला, जिंकण्याची उमेद बाळगलेला..
एक थेंब... कळीच्या गाभार्यातला, समांगाने फुलात उमलवून गेला..
एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला, गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...
अन एक थेंब अखेर...
Sunday, March 2, 2008
♪ मराठी ♪
ठरवीलेले मनसूबे पुर्ण होतातच असे नाही
♪ मराठी♪

Thursday, February 28, 2008
अक्षतांचं चांदणं ....

Wednesday, February 20, 2008
भावना...........

ज्या ज्या वयात जे जे करायचं

त्या त्या वयात ते ते करायचं!
आईलाही....

वडील घरचे अस्तित्व असतात..............

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं............

दूरावा म्हणजे प्रेम...

तू जवळ असतीस तर,

तू जवळ असतीस तर,
कदाचीत स्वप्नांमध्ये जगत नसतो..
पण मग, वास्तवात तरी कुठं जगत असतॊ...
कदाचीत स्वप्न अन वास्तव यांच्यातील दूवा तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत एकटाच गुणगूणत नसतो...
पण मग, तुझ्या आवाजात तरी कसा मुरलॊ असतॊ...
कदाचीत माझ्या मनाचा आवाजच तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत असा गुमसूम बसत नसतॊ...
पण मग, भानावर तरी कुठं असतॊ...
कदाचीत माझ्या भावनांचा आधारचं तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस...
तुझ्या दूराव्याचं कारण मला माहित आहे..
अन तुझ्या आठवणींचं वास्तव्य देखील माझ्याजवळ आहे...
पण तुझ्या वास्तव्यातही तर माझ्याच आठवणी आहेत...
कदाचीत आपल्या आठवणीचं आपलं वास्तव्य आहे...
कारण वस्तव्यात जरी नसलीस तरी,आठवणींत तू माझ्या अन मी तुझ्या जवळ आहे....