Sunday, May 4, 2008


पाचोळा समजून चरोळ्याना माझ्या तुडवू नका,कृपा करून माझ्या शब्दाची खिल्ली मात्र उडवू नका.राग येत नाही, पण वाईट वाटतं इतकंच...माझं किवा तुमचं कोणाचं तरी... नशीब मात्र फुटकंच !खरं तर हा ज्याच्या त्याच्या पहाण्याचा दृष्टीकोन आहे,तसंही जगात सर्वसुखी असा कोण आहे ?म्हणून काही लिहू नये... असंही वाटू लागतं,त्याक्षणी दुसरं मन माझं ... जाब माझ्याकडे मागतं !मन म्हणतं.......................उधळ रंग कल्पनाचे, खुलुदे काव्याची कळी,शब्दान्धान्च्या काव्याला.... नको पडूस असा रे बळी.स्वयंप्रकाशी तारयाचा, अरे ज्याना त्रास होतो..काजव्यात वा दिव्यात ज्याना सुर्याचा भास होतोअशा शुल्लक उल्लुकाना, काय कळावा राजहंस ?मोरपंखी स्पर्श देखील... ज्याच्यासाठी सर्पदंश !म्हणूनंच.....माझ्या आनंदासाठी मी काही काव्य करत जातो,स्वर्गसुखाच्या अपेक्षेने खरं तर मी मरत जातो...मेल्यानंतरच स्वर्ग पहाण्यात आहे खरी मजा...काय फायदा आहे, होण्यात भातुकलीतला राजा ?शब्दाना धार असते, तरीही.....जिभ कापली जात नाहीम्हणून कहिही लिहावं, अशी आपली 'जात' नाही.

No comments: