कधी तू...शीतल वाटणारी चांद रात...कधी तू...जाळून खाक करणारी सूर्याची आग...
कधी तू...धमकावनाऱ्या सागरात...कधी तू...कवेत घेणाऱ्या आकाशात...
कधी तू...विनाश आणणाऱ्या वादळ वाऱ्यात...कधी तू...अंकुर फुलवणाऱ्या पाऊस पाण्यात...
कधी तू...विजेच्या कडकडाटात...कधी तू...रात्रीच्या मंद आवाजात...
कधी तू...भिरभिर भिरणाऱ्या भ्रमरात...कधी तू...निपचित पडलेल्या सिंहात...
कधी तू...मन मोहणाऱ्या गुलाबात...कधी तू...चिखलात उगवणाऱ्या कमळात...
कधी तू...कडवट निम्बात...कधी तू...बहरलेल्या आंब्याच्या मोहरात...
कधी तू...रातराणीच्या सुगंधात...कधी तू...मध्यान्हीच्या भर उन्हात...
कधी तू...एकत्र घालवलेल्या दिवसात...कधी तू...आठवणीत काटलेल्या एक एक क्षणात...
कधी तू...बेफिकीर बेलगाम हसण्यात...कधी तू...आवर घातलेल्या हमसून रडण्यात...
कधी तू...मनाला येऊन मिळणारी ओलसर लाट...कधी तू...परतीच्या पाऊलखुणा नसलेली एकाकी वाट...
कधी तू...उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत...कधी तू....माझ्या मिटलेल्या पापण्यात...
No comments:
Post a Comment