Sunday, December 5, 2010

कधी त्या जागेवर


कधी त्या जागेवर संध्याकाळी
ती बिलगून अशीच बसायची
मावळतीला तोच सूर्य
अन मनात ती हुरहूर अशीच असायची
.
.
.
हातात हात असायचा तिचा
समोर असायचे निळ आकाश
मनात उद्याची स्वप्न अनेक
दोघे बसायचो रंगवत खास

श्वासात श्वास अडकायचा कधी
चढत जायची धुंदी अनाम
बरसायच्या कितीतरी प्रेम धारा
व्हायचो जरी किती बदनाम

सात जन्म साथ द्यायची
वचन द्यायचो रोज कितीतरी
हे रेशीम बंध नाजूक
गुंफित जायचो रोज कितीतरी

रात्र व्हायची अन विरह सलायचा
समोरचा काळोख उगीच मनात दाटायचा
काय व्हायचे नक्की ठाऊक नाही
काहीतरी सुटतंय नेहमी भास व्हायचा
.
.
.
आज ही मी त्याच जागेवर
तीही बिलगून तशीच बसलेली
मावळतीला जणू सूर्य असा मी
अन तिने मात्र ... जागा बदललेली

No comments: