Saturday, March 15, 2008

एक थेंब ....


एक थेंब .... पानावर सजलेला.. हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..
एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला, धरती चुंबनाच्या प्रतिक्षेत तहानलेला..
एक थेंब .. कमळाच्या देठावर अधारलेला, ओघलण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..
एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला, आपणच तळे झालो या आंनदाने भारावलेला..
एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला, गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..
एक थेंब ... थेंबाथेंबातुन बरसलेला, शिस्तिच्या आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..
एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला, जिंकण्याची उमेद बाळगलेला..
एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला, समांगाने फुलात उमलवून गेला..
एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला, गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...
अन एक थेंब अखेर...

आठवणीच्या स्पंदनातला, ओल्या पापण्या अन ओल्या कडातून मना ओलावलेला..

Sunday, March 2, 2008

♪ मराठी ♪


उगवणारी प्रत्येक सकाळ नवी पालवी फ़ुलवते

मात्र मावळती संध्याकाळ रीतेपणाची चाहुल देते

आयुष्यातील घटनांचा संदर्भ लावताना

अश्रुच टीपायला लागतात त्यातून सावरताना

ठरवीलेले मनसूबे पुर्ण होतातच असे नाही


तरी ते ठरवीण्याची आपली खोड जात नाही


आपल्या जवळ जे नाही त्याचीच मानवी मनाला ओढ असते

सर्वच मनं सारखी घडत नसतात

म्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते


माज़े काहि चुकत् नव्हते तिचे वागने वावगे नव्हते,

ऐक् मात्र खर् कि बरोबर् कहिच् येत् नव्हते!


तस् पाहिल् तर् निर्जीव् हवा

आलि अन् गेली, पन् जो पर्यन्त् आत् होती

शरीरात् जीवन् फ़ुलवून् गेली!


सगळ्या गोष्टी कशा भराभर घडत गेल्या

मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत

एकाकी कातरवेळा उठवायला आल्या


उगवणारी प्रत्येक सकाळ नवी पालवी फ़ुलवते

मात्र मावळती संध्याकाळ रीतेपणाची चाहुल देते


आज उणे आले आयुष्यात तर

उद्या अधिकही येतील, नेहमीच चुकणारी गणितं

पैकीच्या पैकी मिळवून जातिल!!!


उधाणलेला सागर वादळी वारा,

बुडणारी नाव आणि शांत किनारा!!!

♪ मराठी♪


तुझ्याविना माझी सगळी वस्तीच बकाळ झाली,

विचार करता करता न कळत सकाळ झाली..


जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...

काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!


तुझ्या घरावरून जातानाहल्ली तिकडे नजर वळत नाही...

मनाचे ठीक आहे गपण आसवांना काहीच कळत नाही.........


तुझा विचार करणं आता नकोसं वाटतं

अस म्हणून मन माझं मलाच फ़सवतं


कधी कधी मला वाटतंमी अजरामर असेन

झाली जर का जगबुडी तर तुमची वाट बघत बसेन


मला माहित नसलेलं दुःख माझ्या मनात साठून आहे

बरेचदा मी विचार करतो नक्की याचा ओघ कुठुन आहे


आनंदाचे क्शण लवकर संपतात आठवणी बनून मनात साठतात

हे दिवसही असेच संपतील आठवणी होउन पुन्हा बोचतील...

दीप मझ्या आठवणींचा जाशील तिथे सांभाळ

कोण जाणे आयुष्याची केव्हा होइल संध्याकाळ...


सुवर्णाच्या पावलांनी लक्ष्मी म्हणून नव्या घरात शिरायच

हातावरच्या पुसट होणार्‍या रंगासवे माहेराला विसरायचं....