Wednesday, January 31, 2007

अबोली सांज................


ती अबोली सांज होती

ती अबोली सांज होती,

की होती शांत रात्र

पन तीच्या डोळ्यात दिसत होते

माझेच छायाचित्र

अन् सजले होते

स्वप्नही तिच्या डोळ्यान्मध्ये

कि हरवले होते मन

तिच्या प्रेममध्ये

असे वाटे माझ्या मनाला

तिचे सौंदर्य पाहून

आली असावी परी

आकशातील चांदन्या लेवून

ती शरद चांदनी अशी काही हसली

आणि कळलेच नाही मला

ती कशी कुठे हरवली

आठवनित तीच्या आता

कसा बसा रमतो आहे

या गुलबी क्षनांनाही

आता तीचिच वाट आहे

आता तीचिच वाट आहे

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!


पहिलं वाटलं थोड थांबाव....

नंतर म्हटलं सांगुन टाकावं.....

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!

भिरभिरते डोळे ...अस्थिर मन....

याला केवळ एकच कारण.....

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!

दिवस-रात्र एकच धुन....

घुमत असते प्राणा-प्राणांतुन....

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!

पटलं तर स्विकार....

नाहितर नकार...

तरिसुद्धा....तरिसुद्धा....

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!

माझं तुझ्यावर प्रेम आहे...!!!

एक माणुस मला भेटलाय,


एक माणुस मला भेटलाय,

दुःखाकडे हसत हसत पहाणारा,

सुखाकडे केविलवाण्या नजरेनं,

डोळे भरुन पहाणारा,

दुसऱ्यांच्या दुःखात

आपलं दुःख शोधणारा

पाठीवर दुःखाचं ओझं घेवुन चालणारा,

वाटेवरल्या पाउलखुणा,

न बुजविता चालणारा,

आपलं दुःख कुणापाशी,

कधीही न सांगणारा,

एक माणुस मला भेटलाय,

झऱ्यासारखा वहाणारा....

तिलाहि झोप आली नसेल . . .


मला खात्री आहे

तिलाहि झोप आली नसेल . . .

सुंदर स्वप्नं पडत असतील

तरिही कुशिवर वळेल ...उसासेल...

मला खात्री आहे

तिलाहि झोप आली नसेल

तिच्यासमोरहि तेच ढग ..

जे माझ्यासमोर.. तिच्यासमोरहि तेच धुकं ...

जे माझ्यासमोर..

तिचे नि माझे स्वल्पविरामही सारखे

अन पुर्णविरामही..

म्हणुन तर मी असा

आकंठ जागा असताना

तिची पापणीहि पूर्ण मिटली नसेल ..

मला खात्री आहे

तिलाहि झोप आलि नसेल .........

प्रेम करण्यात तल्लिन होतो............


वाट काट्यान्ची होती कधी जाणवलीच नाही,
सोबत तुझी होती मला जमीन भासलीच नाही,
मि माझ्या भावविश्वात असाच रन्गीन होतो,
मी फ़क्त तुझ्यावर प्रेम आणि प्रेम करण्यात तल्लिन होतो............

रक्ताचा अभिषेक घड्ला गवताला त्याला पाहावले नाही,
हसु माझे पाहुन अश्रु गाळल्यावाचुन राहावले नाही,
मी आयुष्याची वजबाकी सोडुन सुखाच्या गुणाकारात मग्न होतो,
मी फ़क्त तुझ्यावर प्रेम आणि प्रेम करण्यात तल्लिन होतो............

लाल विश्व होत समाधानाच कुणाला असच समजल नाही,
चार क्षणातच तो स्वर्ग होता कधी अन्तर उमगलेच नहि,
मि जीवन म्रुत्युच्या व्याख्या सोडुन म्रुत्यु जगण्यात दन्ग होतो,
मी फ़क्त तुझ्यावर प्रेम आणि प्रेम करण्यात तल्लिन होतो............

Friday, January 12, 2007

एका सागराची कथा...


एका सागराची कथा...

एकदा काय झालं,

एक सरिता रागवली

आपल्या boyfriend ला म्हणाली'

हे रे काय सागर !

मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का

मीच का यायचं खाली डोंगरावरून ?

आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी

दरी बघायची नाही

कडा बघायचा नाही

कशी सुसाट पळत येते मी

विरहव्याकुळ, संगमोत्सुक

कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन

तुझ्यात हरवून , हरपून जाईन आणि तू वेडा

तुझं लक्षच नसतं कधी

सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.

उसळतोस तिच्यासाठी

तुझ्यासाठी पाणी आणते मी

पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !बोलणारच नाही आता.

येणारही नाही.

काठावरच्या लोकांना सांगून मोट्ठं धरण बांधीन

थांबून राहीन तिथेच.बघच मग.

सरिताच तीबोलल्याप्रमाणे वागली.

सागर बिचारा तडफ़डला

आकसला, आतल्या आत झुरत गेला.

शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा

उठला ताड

ओरडला दहाड

उफ़ाळला वारा पिऊन

लाटांचं तांड्व घेऊन

सुटला सुसाट सरितेच्या दिशेने

लोक येडे.

म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'