Tuesday, December 26, 2006

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!


माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिचं बोलणं; तिचं हसणं;

जवळपास नसूनही जवळ असणं

जीवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;

अचानक स्वप्नात दिसणं !!

खट्याळ पावसात चिंब न्हायच !

माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

केसांची बट तिने हळूच मागे सारली....

डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,

प्रत्येक कण मनात साठवतो !

ती रुमाल विसरुन गेली !

विसरुन गेली की ठेवून गेली?

आपण सारंच आठवतो

प्रत्येक क्षण मनात साहवतो !

आठवणींच चांदणं असं झेलून घ्यायचं !

माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिची वाट बघत आपण उभे असतो.....

ठरलेली वेळ कधीच टळलेली असते !

येरझाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसत रस्त्यावर !

सगळयांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!

माणासं येतात, माणासं जातात

आपल्याकडे संशयाने रोखून बघतात !

उभे असतो आपण आपले मोजीत श्वास

एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते !

अखेर ती उगवते !! इतकी शांत ! इतकी सहज !

चलबिचल मुळीच नाही !

ठरलेल्या वेळीच आली होती जशी काही !!

मग तिचा मंजूळ प्रश्न : "अय्या ! तुम्ही आलात पण?"

आणि आपलं गोड उत्तर: नुकताच ग ! तुझ्या आधी काही क्षण !

काळावर मात अशी ! तिच्यासोबत भुलत जायच !

माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

एकच वचन कितीदा देतो आपण !

एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरी सुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात !

पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना ती उगीच लाजू लागते,

फ़ुलांची नाजूक गत, मनात आपल्या वाजु लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी आभाळ मनावर भरुन जातं ;

भिजलेल्या मातीसारखं आपलं असणं

सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !

माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

Sunday, December 3, 2006

प्रेमसत्र................


प्रेमसत्र

रोमांचित गारवा

रात पुनव चांदवा

धुंद धुंद ही हवा

नको मंदही दिवा

चुकार एक काजवा

फितूर तोही साजणा

कंकणी सलज्ज किणकिणाट

हळूच हळूच कुजबुजाट

स्पर्श स्पर्श फुलवितात

देहावर पारिजात

चढत जाई रात्र रात्र

अधीर मदीर गात्र गात्र

सरू नये कधीच हे,

असे सुरेल प्रेमसत्र

तीच्यावरचं प्रेम



त्या हिरव्या हिरव्या रानात

पाहीले होते सुदंर ..

प्रतीबिंब तुझे त्या निखळ स्वछ पाण्यात ....


भिडले होते डोळे..

डोळ्यांना तुझ्या ..

त्या प्रेमाचे गाणे गुणगुनण्यात ...


पाहीले होते तुही मला...

चोरुन चोरुन असे

माझ्या प्रतिबिंबाला त्या वाहत्या पाण्यात...


वाटले होते मला आता

विचारुन टाकावे..

काय आहे तरी तुझ्या मनात...


केला प्रयत्न प्रेमाचे

दोन शब्द सांगायचा...

होत तो एक क्शन तुला माझे करण्याचा...


मग अडवलेस तु मला...

समजावलेस माझ्या मनाला...

म्हणालीस आवर तुझ्या ह्या वेड्यामनाला...


वाटले होते वाईट खुप ..

पण सावरले होते मी स्वत:ला..

कारण ऎकायचे होते मला फक्त तीच्या भावनेला...


कुठे आहेस आता तु...

ते मला नाही माहीत...

तुझ्या त्या डोळ्यातल प्रेम

पुन्हा कधीच दिसले नाही मला..


अजूनही तुझाच आहे ..

तुझ्या येण्याची आस लावुन बसलो आहे...

गत आठवणीचे निखारे ..

चराचरात सोसतो आहे.....

Friday, December 1, 2006

आठवणी दाटताना...........


आठवणी दाटताना

मीच मला विसरताना

त्याच जगी पोचतो मी

त्याच खुणा शोधतो मी

तोच पुन्हा आभास जुना.....

त्या रिक्त नभी हिंडताना

आठवणी दाटताना .....

सूर ते आठवावे

गीत मी गुणगुणावे

तीच पुन्हा सुरूवात जरा अन

तीच लगेचच सांगता...

शब्द तुझ्यावाचून सुने अन

कातर कातर शांतता...

पुन्हा स्तब्धता सोसवेना

आठवणी दाटताना

मी कोण्??.........


मी कोण् आहे बर??

मी शोधतोय स्वतःहाला माझ्या प्रवासात..

कधी वाटते मीच हरवलोय कुठे तरी

आज इथे अन् उद्या तिथे शोधतोय काही तरी..

मागासलेला असलो तरी मागासलेला नाही

आणि आपल्या माणसांचा असलो तरी आपल्या माणसात् नाही..

बरीच प्रश्न मनाला भेडसावत असतात

हलक्या पावलांनी आलेली स्वप्ने खुणावत असतात..

प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता हल्ली मीच कोड्यात पडतो

राहुदे गड्या म्हणुन मग मीच स्वतःहाची समजुत काढतो...

काय हरवलय विचार करता करता मीच हरवुन बसतो

आणी जुन्या आठवणींची एक छानशी सवारी करुन येतो..

आठवणींच्या कप्यात अजुनही शाळेची पाटी कोरी आहे

अन त्याच बाकावर मित्रांबरोबर बसण्याची ईछा मात्र मनी आहे..

मला एकदा माझ्या शाळेतली सकाळची घंन्टा ऐकायची आहे

शाळेत जातानाची मनाची हुरहुर अनुभवायची आहे..

तोच जुन्या मित्राचा सहवास हवाय मला

शाळेचा एक आभास हवाय मला..

आता या प्रश्नांची उत्तरे शोधावी..

की असेच पुढे जावे..

कडु गोड आठवणींसोबत हसावे के रडावे??

हे प्रेम आहे..............


हे प्रेम आहे

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,

तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,

तर हे प्रेम नाही ही तर वासना....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही

असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,

तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही

तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,

तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!

जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...

आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,तर ते आहे प्रेम....!

जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,

तर ते आहे प्रेम....!

जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही,

तिला जसेच्या तसे स्विकारता....,तर ते आहे प्रेम....!

जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता

पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही

आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,

तर ते आहे प्रेम....